जिल्हास्तरीय शालेय तायक्वॉडो स्पर्धेत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे यश

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 27, 2023 19:51 PM
views 159  views

कणकवली : महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वाॅडो स्पर्धेत आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.

वयोगट 14 वर्षाखालील मुली या गटामध्ये स्वरा कुबल (इयत्ता 7 वी) व मेहक मेमन ( इयत्ता 9 वी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ  देसाई तसेच शाळेचे सेक्रेटरी मोहन कावळे व इतर पदाधिकारी यांनी या विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक एकनाथ धनावटे यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.