
दोडामार्ग : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व्दारा आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा सरस्वती विद्यामंदिर, कुडासे येथे पार पडली. या स्पर्धेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धे साठी तब्बल 16 खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक वरदान वासुदेव परब , द्वितीय क्रमांक बाळकृष्ण नारायण गवस , तृतीय क्रमांक कुमार साईराज रामा वरक, चौथा क्रमांक कुमार सुरज बाबुराव जंगले, 19 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कुमारी साधना महादेव गवस, द्वितीय क्रमांक कुमारी नंदा लक्ष्मण गवस , तृतीय क्रमांक कुमारी रिया जनार्दन गावडे, कुमारी ममता कृष्णा सावंत, 17 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक कुमारी दिशा दिलीप आरोसकर, तृतीय क्रमांक कुमारी तनुजा लक्ष्मण काकतकर, 14 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक श्रेयस सुरेश राठोड , तृतीय क्रमांक कुमार गोरक्ष देवानंद शेटये, चौथा क्रमांक कुमार रामचंद्र दिलीप आरोसकर , 14 वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया प्रभाकर राठोड, चौथा क्रमांक कुमारी कनिष्का विष्णू रेडकर, पाचवा क्रमांक कुमारी शुभ्रा मिलिंद सावंत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थाध्यक्ष श्री विकास भाई सावंत, उपाध्यक्ष डॉ .श्री दिनेश नागवेकर, खजिनदार श्री सी एल नाईक, सचिव श्री व्ही बी नाईक, मुख्याध्यापक श्री प्रल्हाद सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंना श्री बामणीकर सर व श्री पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.