
देवगड : मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धांमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलापूर्ण सादरीकरणाने उज्ज्वल यश संपादित केले, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक फेरीतील २३ कलाप्रकारापैकी एकूण १४ कलाप्रकारात अंतिम फेरीसाठी निवड झाली.
मुंबई येथे संपन्न झालेल्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीमध्ये विविध कला प्रकारातील सादरीकरण करण्यात आले, त्यामध्ये देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे विविध कला प्रकारात यश संपादन करून महाविद्यालयास सुवर्ण पदक, रौप्य पदक, कांस्य पदक तसेच उत्तेजनार्थ अशी बक्षिसे प्राप्त केली आहेत. प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) – १. शास्त्रीय संगीत – सुधांशू सोमण, २. नाट्य संगीत – सुधांशू सोमण द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) – कथा कथन – नुपूर लळीत, Short film making – आकाश सकपाळ, ओम मिठबांवकर, दीपक जानकर, सोहम ठाकूर, शिवानी खवळे, श्रावणी गांवकर, प्रतिक चव्हाण, साहिल दीपक जाधव, साहिल दिलीप जाधव, सर्वेश मेस्त्री , गौरव सुतार , फाईजा काझी, दीप्ती जोशी, सुधांशू सोमण. तृतीय क्रमांक (कांस्य पदक) – मूर्ती कला- गौरव सुतार उत्तेजनार्थ – विडंबन नाट्य (Skit) – आकाश सकपाळ,ओम मिठबांवकर,शिवानी खवळे,श्रावणी गांवकर,प्रतिक चव्हाण,साहिल दिलीप जाधव, एकांकिका मराठी (अभिनय) – आकाश सकपाळ. तसेच कु. सुधांशू समीर सोमण ह्या विद्यार्थ्याचे सलग दुसऱ्या वर्षी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठीय युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आलेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे शिक्षण विकास मंडळ संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.