सेंट्रल इंग्लिश स्कूलचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत यश !

दोन खेळाडूंची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
Edited by: विनायक गांवस
Published on: December 06, 2022 16:35 PM
views 391  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा सोमवार दि. ५  रोजी पंचम खेमराज महाविद्यालय ,सावंतवाडी येथे शालेय तालुकास्तरीय  कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १४ वर्षाखालील  विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या  कु. स्वरा दिनेश गावडे व कु. हुमेरा मुझफ्फर मिर्झा या विद्यार्थीनींची

जिल्हास्तरीय  कॅरम स्पर्धेसाठी वैयक्तिकरित्या निवड करण्यात आली.

या विद्यार्थिनींना प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा  आणि  शिक्षक विष्णू माणगांवकर यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय कॅरमस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.