
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मंगळवार दि. १२ व १३ डिसेंबर रोजी पंचम खेमराज विद्यालय, बांदा येथे शालेय मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १७ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या इ. ९ वी तील कु. मसिया मार्टीन आल्मेडा या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत धडक मारली.
या विद्यार्थिनीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ आणि क्रीडा शिक्षिका श्रीम. मसिया मार्टिन आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले. सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षक श्रीम. मारिया पिंटो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु. मासिया आल्मेडा हिचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .