सेंट्रल इंग्लिश स्कूलचं इंटरमिजिएट ग्रेडमध्ये यश

Edited by: विनायक गांवस
Published on: January 11, 2025 11:16 AM
views 310  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनींनी शासकीय चित्रकला परीक्षेत यश संपादन केले आहे‌. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत घेण्यात येणार्‍या शासकीय इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या.

शासकीय इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेत सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी या विद्यालयातील कुमारी जिया बशीर शेख हिने A ग्रेड तर कुमारी हूमेरा मुझफ्फर मिर्झा व कुमारी मायरा युसूफ शेख आणि रिद्धी अवधूत गावडे ह्यांनी B ग्रेड मिळवून चित्रकला परीक्षेत आपले नावलौकिक केले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी ,पालक - शिक्षक संघ कार्यकारणी समितीचे सर्व पदाधिकारी ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.निर्मला हेशागोळ, मार्गदर्शक कलाशिक्षक विष्णु माणगावकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  पालकवर्ग आणि शालेय विद्यार्थी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .