
वैभववाडी : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रतिकृती, निबंध, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा या स्पर्धांमध्ये अर्जुन रावराणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.या विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
तालुकास्तरीय ५२ वे विज्ञान प्रदर्शन दि.१२ व १३ डिसेंबर रोजी माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये अ.रा.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये प्राथमिक गट प्रतिकृती मध्येसिद्धेश संतोष भंडारी ( इयत्ता ८ वी )प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धा वैष्णवी गणेश हावळ ( इयत्ता ८ वी ) प्रथम क्रमांक ,. वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गट व उच्च माध्यमिक गटात हर्ष विनोद जांभळे ( ११ वी विज्ञान शाखा)द्वितीय क्रमांक, निबंध स्पर्धा माध्यमिक व उच्च माध्यमिक गट शिवानी रत्नाकर फुकट ( इयत्ता ९ वी ) तृतीय क्रमांक,प्रश्न मंजुषा स्पर्धेत माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात कस्तुरी विलास पाटील (१० वी ) व चंदना परशुराम गुरव ( ९ वी ) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे व केंद्र प्रमुख गौतम तांबे यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व वैभववाडी पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या उपस्थितीत अभिनंदन करण्यात आले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पोलिस कॉन्स्टेबल राठोड, मार्गदर्शक विज्ञान शिक्षक-शिक्षिका ,सर्व प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.