
सावंतवाडी : गेले काही महिने रखडलेले शहरातील पांजरवाडा पुलाच्या कामासह रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी राकेश नेवगी यांनी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आले आहे.
पांजरवाडा ते माठेवाडा जोडणारा पुलाचा रस्ता अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना येथुन तारेवरची कसरत करावी लागत होती. याकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राकेश नेवगी यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर तात्काळ प्रशासनाने या रस्त्याच्या खडीकरण करत डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली. तसेच या रस्त्यावर गतिरोधकाची मागणी केली होती. या गतिरोधकाचीही काम पूर्ण करण्यात येत आहे.
दरम्यान या कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, काशिनाथ उर्फ बाबल्या दुभाषी, इफ्तेकार राजगुरू, हिदायतुल्ला खान, संतोष जोईल यांनी केले.