आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

ग्रामसेवकांना बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे CEO याचे गटविकास अधिकाऱ्यांना आदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 07, 2024 12:20 PM
views 561  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणित दाखले देणे नियमाधीन असताना ग्रामसेवकांनी त्यांस नकार देत संघटनेचा निर्णय सांगून विरोध दर्शविला होता. या संदर्भात आमदार वैभव नाईक यांनी बांधकाम कामगारांच्या पाठीशी राहत   प्रशासनाला जाब विचारून जिल्हाधिकारीं व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते .तसा पत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. 

आमदार वैभव नाईक यांच्या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्ववत दाखले देण्याचे ग्रामसेवकांना निर्देश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने  आमदार वैभव नाईक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी आज बैठक घेत  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी 90 दिवसाचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी केली अखेर जिल्हा परिषद  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना दाखले देण्याचे निर्देश देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख यांनी पत्राद्वारे दिले आहेत. यापुढे गावागावातील गोरगरीब कष्टकरी कामगारांना दाखले देऊन ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले