पाणबुडी प्रकल्प कुठेही गेला नाही : निलेश राणे

Edited by:
Published on: January 01, 2024 18:04 PM
views 262  views

कुडाळ : पाणबुडी प्रकल्पाबाबत आमदार वैभव नाईक धादांत खोटे बोलत आहेत. पाणबुडी प्रकल्प कुठेही गेलेला नाही महाराष्ट्राचा पाणबुडी प्रकल्प नियोजित वेंगुर्ला समुद्रकिनारी होणार असल्याचा पुनरुच्चार माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना केला.

तर आमदार वैभव नाईक यांनी 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ला निवती समुद्रकिनारी आणला होता. तर या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक तरतूद केली ही होती तर तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अर्थसंकल्पावेळी ही आर्थिक तरतूद करून घेतली होती व त्यानंतर त्या पाणबुडी साठी ऑर्डर ही देण्यात आली होती.

तर दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची पाणबुडी किमतीच्या पाणबुडीचे ऑर्डर देण्यात आली होती. गेले दीड वर्षानंतर पद्धतशीरपणे गुजरातला नेण्याचा गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा डाव असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले होते. या टिकेला उत्तर देताना माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत आमदार वैभव नाईक खोटे बोलत असल्याची टीका केली.

निलेश राणे आज श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे अयोध्या येथील श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने मंत्रपुष्पित अक्षतारूपी निमंत्रण पोहोचवण्याचा शुभारंभ सोमवारी कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे निलेश राणे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यानी सांगितले प्रकल्प रद्द झालेला नाही महाराष्ट्राचा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल तो वेंगुर्ले मध्ये होणार. गुजरातचा गुजरात मध्ये होईल महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये उद्या कर्नाटक मध्ये झाला तरी आश्चर्य वाटायला नको असा टोलाही त्यांनी लगावला. तर आमदार वैभव नाईक धादांत खोटे बोलत असल्याची टीका यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी केली.