
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेले पाणबुडी प्रकल्प आणि ॲम्युझमेंटपार्क हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
तसेच मालवण व विजयदुर्ग येथे शिवसृष्टीची निर्मिती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटकांचा आकर्षण केंद्र बनेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची साथ आपल्याला आहे. पालकमंत्री नितेश राणे, रविंद्र चव्हाण, आमदार निलेश राणे यांच्या साथीनं जिल्ह्याचा कायापालट निश्चित होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेले पाणबुडी प्रकल्प आणि ॲम्युझमेंटपार्क हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.