गोळवण सरपंच सुभाष लाड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 09, 2023 14:48 PM
views 821  views

मालवण : मालवण गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत सरपंच सुभाष दत्ताराम लाड यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे दाखल केला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे, कर्तव्यात कसूर करणे, मासिक सभेत घेतलेले ठराव अंमलात न आणणे अशी कारणे या अविश्वास प्रस्तावात नमूद करण्यात आली आहेत.


गोळवण सरपंच सुभाष लाड हे थेट लोकनियुक्त सरपंच म्हणून तीन वर्षांपूर्वी निवडून आले आहेत. त्यांच्यावर अविश्वास तहसीलदार दाखल करताना सदस्यांमध्ये शिल्पा सतीश तेली, शरद राजाराम मांजरेकर, विरेश मधुकर पवार, साबाजी देविदास गावडे, एकादशी आत्माराम गावडे, मेघा मुरारी गावडे, सौ. विभा विकास परब या सात सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर सह्या केल्या आहेत.