
देवगड : सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते तसेच कठोर परिश्रमामुळे प्राविण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा या शब्दात अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी विद्यार्थ्यांनी आज यशाचा मूलमंत्र दिला.आजचे विद्यार्थी विद्यार्थी तंत्रज्ञानस्नेही असल्यामुळे मोबाईल फोन, संगणक या माध्यमातून ज्ञान प्राप्त करीत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये निसर्गदत्त बुद्धिमत्ता असते, या बुद्धिमत्तेला पैलू पाडण्याचे कार्य शिक्षक व पालकांना करावे लागेल असा विश्वास देखील नंदकुमार घाटे यांनी व्यक्त केला
देवगड अजिंक्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्यावतीने इयत्ता बारावी मध्ये मनस्वी विनायक बंदिवडेकर या विद्यार्थिनी 92.50 टक्के तर शिवानी प्रशांत मिस्त्री या विद्यार्थिनी इयत्ता दहावी मध्ये 97.60 टक्के गुण मिळवल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.व्यवस्थापक प्रमोद कोयंडे,रामदास अनुभवणे,चंद्रकांत पाळेकर,दिलीप रुमडे, पुनम कुबल,उदय रूमडे, उल्हास रूमडे,अभय बापट,अमित गोळवणकर तसेच सुधीर देवगडकर नाना मुणगेकर,नेत्रा पेडणेकर,भक्ती करगुटकर आदी उपस्थित होते.