आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याची सांगड घालून अभ्यास करा : डॉ. रमा प्रभूदेसाई

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 11, 2024 13:32 PM
views 115  views

देवगड : देवगड येथील मोंड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदिर व श्री नामदेव मोतीराम माणगावकर कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ  व वरिष्ठ महाविद्यालय मोंड यांचे संयुक्त विद्यमाने पारितोषिक वितरण समारंभ सन 2023-24 चा दिनांक 3.1.2024 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रमा प्रभूदेसाई या उपस्थित होत्या.

त्यांनी मार्गदर्शन करताना जीवनात आरोग्य किती मौल्यवान तसेच उत्तम आरोग्य आणि मानसिक स्वास्थ यांची सांगड घालून अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. आरोग्य जपण्यासाठी  रोज नित्यनियमाने अर्धा तास योग व खेळ यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते आणि त्यामुळे आनंदी जीवन जगता येते हे सांगत असताना त्यांनी काही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर करून विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली त्यामुळे त्याचा आनंद ही विद्यार्थ्यांना घेता आला.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री यशवंत बोडस सर तसेच सेक्रेटरी महेंद्र माणगावकर माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक लवूशेठ मोंडे , माजी सेक्रेटरी व माजी उपसभापती संजय देवरुखकर, मुख्याध्यापिका आसावरी कदम तसेच सहसचिव राजाराम तांबे त्याचबरोबर संचालक प्रसाद कार्लेकर आणि विजय माणगावकर त्याचबरोबर मोंडपार सरपंच गणेश तिर्लोटकर व  मोंडचे प्रतिष्ठित नागरिक दशरथ अनभवणे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे निवेदन सौ.आदिती बांदिवडेकर मॅडम यांनी केले.मुख्याध्यापिका कदम मॅडम यांनी प्रास्ताविका मध्ये वार्षिक कामकाजाचा आढावा प्रस्तुत केला. सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला. आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री संजय धुरी यांनी केले. अशा प्रकारे पारितोषिक वितरण समारंभ व दुसऱ्या सत्रात विद्यार्थांचे विविध गुणदर्शन  कार्यक्रम संपन्न झाला.