विद्यार्थ्यांनी केले मतदान

जि. प. पू. प्रा.सांगुळवाडी नं. १ ने राबविला उपक्रम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 25, 2024 14:25 PM
views 101  views

वैभववाडी : लोकशाहीतील मतदानाचा हक्क विद्यार्थ्यांना समजावा या उद्देशाने तालुक्यातील जि. प. पू. प्रा.सांगुळवाडी नं. १ या शाळेने एक अनोखा उपक्रम राबविला.शाळेत  " शालेय स्वराज मंत्रिमंडळ" स्थापनेसाठी थेट मतदान प्रक्रिया राबविली.निवडणुक विभागामार्फत ज्याप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविली जाते त्याचप्रमाणेच ही प्रक्रिया राबविण्यात आली.त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट १८वर्षे पुर्ण होण्यापूर्वीच निवडणुकीचा अनुभव घेता आला.प्रशालेत शिस्तबद्ध वातावरणात ही निवडणूक पार पडली.

लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भारतीय नागरिकाला १८वर्षे पुर्ण असणं गरजेचं आहे.हा मतदानाचा हक्क कसा बजावला जातो याचं कुतूहल विद्यार्थ्यांसह मतदानास पात्र नसलेल्या प्रत्येकाला असतो.ही बाब लक्षात सांगुळवाडी येथील पुर्व प्राथमिक शाळेने शाळेतील मंत्रीमंडळ स्थापनेसाठी मतदान प्रक्रिया राबविली. गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आल.

मतदार म्हणून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लढविणाऱ्या इ. तिसरी ते सातवीच्या विदयार्थ्यांपैकी इयत्ता सातवीमधील कु. दिशा दिपक सुतार ही मुख्यमंत्री पदासाठी बिनविरोध निवडून आली, तर उपमुख्यमंत्री , सांस्कृतिक मंत्री, सहल मंत्री, अभ्यासमंत्री, क्रीडा मंत्री, स्वच्छता व आरोग्यमंत्री,  अर्थमंत्री, पाणीपुरवठा मंत्री अशा आठ मंत्रिपदासाठी 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.अतिशय निकोप वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.  मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ. स्नेहलता राणे, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक महादेव शेट्ये,. समीर सरवणकर यांनी काम पाहिले.  सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केली.अतिशय उत्साह व शिस्तबध्द   वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.निवडून आलेल्या सर्व विदयार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती  आणि सर्व शिक्षकानी  अभिनंदन केले.शाळेच्या या उपक्रमाचे कौतुकही सा-यांनी केले.