विद्यार्थ्यांनी गिरविले धनुर्विद्देचे धडे !

जानवलीतील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिबिर !
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 10, 2024 07:25 AM
views 182  views

कणकवली : बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल , धनुर्विद्या संघटना सिंधुदुर्ग व सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्तविद्यमाने चार दिवसीय मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिर बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जानवली येथील निसर्गरम्य परिसरात पार पडले. शालेय मुलांनी या शिबिरात भाग घेऊन इंडीयन या धनुर्विद्या प्रकारची माहिती घेऊन प्रत्यक्ष सरावाच आनंद अनुभवला. या शिबिराला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

सकाळच्या सत्रात फिटनेस व धनुर्विद्या या खेळासाठी आवश्यक प्राथमिक तंत्राची माहिती देऊन सराव घेण्यात आला. शिबिर उद्घाटन व समारोप प्रसंगी बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सचिव सुलेखा राणे, धनुर्विद्या संघटना उपाध्यक्ष व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी विनायक सापळे, संदिप सावंत, धनुर्विद्या संघटना सचिव अमित जोशी , प्रशालेच्या  मुख्याध्यापिका कुलकर्णी,आसावरी कुलकर्णी, पालक व शाळा कर्मचारी यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. या शिबिराबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून असे उपक्रम अधून मधून घेण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.