तांबळडेग 'शिक्षणोत्कर्षक'च्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 30, 2025 16:22 PM
views 94  views

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे शिक्षणोत्कर्षक संस्थेच्यावतीने गावच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा  आयोजित करण्यात आला होता. सध्या संगणक युग असल्याने ते ज्ञानआत्मसात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी झटावे, त्यामध्ये कौशल्य दाखवून द्यावे. त्यातूनचविशेष प्रगती साधावी असे समारंभाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक यशवंत येरागी यांनी या कार्यक्रम प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईस्थित तांबळडेग शिक्षणोत्कर्षक संस्थेच्यावतीने शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा, तांबळडेग येथे आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. येरागी यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. प्रारंभी ग्रामस्थ संस्थेचे अध्यक्ष सिताराम तथा काका मुणगेकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, दुहेरी संस्थांच्या समन्वयाने कामकाज पाहिले जाते आहे. मुंबई अध्यक्ष विलास वसंत कुबल यांनी संस्थेचे मुंबई कार्यालय अद्यावत स्वरूपात आकाराला येत आहे. विद्यार्थीनींनी चांगले यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रा. डॉ. राजेश शंकर राजम म्हणाले की, या संस्थेच्या बक्षीसाचे मानकरी होण्याची संधी लाभली. त्यावेळी या समारंभाची वाट पाहत बरेच विद्यार्थी असायचं असे नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, मुक्तद्वार वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर येरागी यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. 

याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष सागर सनये, मुख्याध्यापक सदाशिव फाले , सहशिक्षक रामनाथ गोसावी,तांबळडेग ग्रामसेवा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, सामाजिक कार्यकर्ते गणपत सादये, घणसोली हायस्कूलचे मुख्याध्यापक गणपत भाऊ राजम, मुंबई चिटणीस हरिश्चंद्र कोचरेकर, खजिनदार दत्तात्रय धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस निलेश विठ्ठल सादये यांनी केले.