अबॅकस स्पर्धेत रेडीतील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं सुयश

Edited by:
Published on: June 17, 2025 19:51 PM
views 212  views

वेंगुर्ला : कोल्हापूर येथे प्रोऍक्टिव्ह अबॅकस मार्फत आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. पश्चिम महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत मातोश्री पार्वती राऊत रेडी विद्यालयाचे २० विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी ७ विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले तर ११ विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या "क्यू” या कॅटेगरीमध्ये एकूण सात बक्षिसे होती. त्यापैकी सहा बक्षिसे या विद्यार्थ्यांनी पटकावली. "क्यू” कॅटेगरीमध्ये अंश सूर्याजी या विद्यार्थ्याने पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. ओवेस शेख आणि यशस्वी धुरी यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. तसेच आराध्या जोशी हिने चौथा, नाव्या कोरगावकर हिने पाचवा, तर मानस बागायतकर याने सहावा क्रमांक मिळवला.

याशिवाय पुरप पेडणेकर या विद्यार्थ्याने "पी” कॅटेगरीमध्ये चौथा क्रमांक मिळवला. श्लोक भगत, हर्ष नाईक, प्रभाकर सूर्याजी, श्रीनिवास तानावडे, अधित पुराणिक, मनीष धरणे, पूर्वी धुरी, तनुश्री कृष्णाजी, पूर्व कारेकर, दिशिता कलचावकर आणि विराज धरणे या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना तेजस्वी अबॅकसचे संचालक मनोज शारबिद्रे आणि संचालिका सौ. नूतन शारबिद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाने हार्दिक अभिनंदन केले आहे.