कळसूलकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला सार्वत्रिक निवडणुकीचा अनुभव

Edited by: विनायक गावस
Published on: August 05, 2023 16:12 PM
views 190  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेच्या  विद्यार्थ्यांनी शाळेत सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने सार्वत्रिक निवडणुकीचा अनुभव घेतला.यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, क्रीडामंत्री, शिस्तपालन मंत्री, वाचनालय मंत्री, शिक्षण मंत्री, स्वच्छता मंत्री इत्यादी मंत्र्यांची सर्व विद्यार्थ्यांमधून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवड करण्यात आली.

              निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने  पार पाडण्यात आली.मोबाईलवर 'वोटिंग मशीन ॲप' डाऊनलोड करून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत माध्यमिकच्या 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात मिळालेल्या निवडणुकी संदर्भातील ज्ञानात कृतीची भर पडली व निवडणूक यंत्रणेचे कामकाज कसे चालते हे समजण्यास मदत झाली.

         या निवडणुकीच्या कामांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांनी काम पाहिले तसेच केंद्राध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक श्री एस व्ही भुरे, मतदान अधिकारी नंबर-1 श्रीमती जी एस सावंत, मतदान अधिकारी नंबर-2 श्रीमती पी एम शिंदे, EVM ॲप वापरा संबंधी तांत्रिक सहाय्य श्री एस पी कुलकर्णी, श्री पी बी बागूल, बॅलेट देण्यासाठी मतदान अधिकारी नंबर-3 म्हणून श्री ए जे ठाकर, श्रीमती एस एस दळवी, श्रीमती पी बी शेर्लेकर, श्रीमती एन एन मुंज, श्रीमती एस जी सामंत, छायाचित्रण व्यवस्था श्री के एस टेमकर ,सुरक्षा व्यवस्था प्रशालेतील एनसीसी विद्यार्थ्यांनी व एनसीसी शिक्षक श्री जी बी गवस तसेच सहाय्यक शिक्षिका श्रीमती एस यु बांदेलकर, प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री एन पी धारगळकर यांच्या सहाय्याने पुरविली. विद्यार्थ्यांना निवडणुकीबाबत अवगत करणे तसेच आचारसंहिता,आवश्यक सूचना याबाबत शाळेच्या शिक्षका श्रीमती एस एस चव्हाण, श्रीम एम एम कदम,श्रीम.जे एस पावसकर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने अत्यंत शांततेत पार पडली.    

           याबाबत सर्वांनी समाधान व्यक्त केले. एक उपक्रमशील शाळा म्हणून नवनवीन उपक्रम राबविण्याचा शाळेचा प्रयत्न नेहमीच राहील असे विचार मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.