
चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), पाग विभागाच्यावतीने श्रीकृष्ण हॉल, पाग येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिमाखात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शैक्षणिक, क्रीडा, कला आणि इतर क्षेत्रांत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. या प्रसंगी आमदार मा. भास्करशेठ जाधव (गुहागर विधानसभा), मा. राजमाने साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण), मा. आबासाहेब पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सावर्डे), शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम गुजर, माजी नगरसेवक व चिपळूण अर्बन बँकेचे चेअरमन मोहन मिरगल, माजी नगरसेवक फैसल कास्कर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत त्यांना यशासाठी शुभेच्छा दिल्या. “आजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे. केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही, तर सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले पाहिजे,” असे उद्गार आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान गौरवचिन्ह देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सचिन खरे यांनी केले, तर मिथिलेश (विकी) मनोहर नरळकर (माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख, चिपळूण) यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
या प्रसंगी मंगेश शेलार, संजय भुवड, रुपेश तांबडे (विभागप्रमुख), महेंद्र कांबळी, ऐश्वर्या घोसाळकर, श्रद्धा घाडगे, सुचित्रा खरे, आदेश किंजळकर, अभि शिंदे आदींसह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि पाग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किसन शेठ भुवड, नंदकुमार सावंत, रवींद्र ठसाळे, राजन चिले, शिवप्रकाश घाटगे, अनंत शिंदे, विजय बामणे, संतोष खेडेकर, बालम खेडेकर, सुनिल बांदेकर, संजय सावंत, अविनाश सावंत, महम्मद अली झारे, मोहम्मद कास्कर, सुनिल चिले, शैलेश गोगडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.