शासन मुलांच्या जीवाशी खेळतंय : बाबूराव धुरी

Edited by: लवू परब
Published on: June 29, 2024 16:01 PM
views 143  views

दोडामार्ग  : दोडामार्ग तालुक्यातील मराठी शाळांचा आढावा घेतल्या नंतर तालुक्यातील एकात्मिक बालविकास ची अंगणवाडी मोडकळीस आल्याचे आज निदर्शनास आले एकात्मिक बालविकास विभाग अंगणवाडी मुलांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप उबाठा उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केला आहे. तालुक्यात शाळा किंवा अंगणवाडीतील मुलांच्या जीवितास जर काय झाले तर आम्ही गप्प बसणार नाही असा धमकी वजा ईशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

      तालुक्यातील सावताचावाडा येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्याच्या तक्रारी येथील पालक वर्ग नागरिकांनी फोन द्वारे आपल्याला दिल्या होत्या. आज शनिवारी आघाडीचे पदाधिकारी व उबाठाचे उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली व मोडकळीस आलेली इमारत निदर्शनास आणून दिली.आज शनिवारी त्यांनी येथील सावताचावाडा येथील अंगणवाडीच्या इमारतीची पाहणी केली त्यावेळी संपूर्ण इमारत जीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांच्या सोबत रासष्ट्रवादीचे सुदेश तुळसकर, गौतम महाले, लक्ष्मण आयनोडकर, उल्हास नाईक, ममता नाईक आदी उपस्थित होते. यावेळी धुरी बोलताना म्हणाले की दोडामार्ग तालुक्यातील शाळा किंवा इतर अंगणवाडीतील मुलांच्या जीवितास किंवा जीवित हानी घडल्यास आम्ही गप्प बसणार नाही तर आपण येत्या सोमवारी येथील एकात्मिक बालविकास विभागची भेट घेणार असल्याचे ही यावेळी ते म्हणाले. 


शासन मुलांच्या जीवाशी खेळतंय :- बाबूराव धुरी

दोडामार्ग तालुक्यातील मराठी शाळांची पडझड व तात्पुरती मलपट्टी यावर कोकणसाद वृत्त पत्राने काही दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध करून सरकारला जागे केले होते मात्र निद्रास्त अवस्तेत असलेले सरकार जागे नहोता निद्रास्त अवस्तेतच असल्याचे ते म्हणाले. राज्यातील युती चे सरकार हे जिल्ह्यातील मुलांच्या जीविताशी खेळत आहे. या सरकारला फक्त आपला फायदा दिसतो तर जनतेचा काही सोयर सुतकही पडलेलं नाही, कारण या सरकारला येथील मराठी शाळा बंद करायच्या आहेत म्हणून हे सरकार या माराठी शाळांकडे जाणूनबुझून दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप यावेळी धुरी यांनी केला आहे.


त्या अंगणवाडीतील मुलांची नावे काढली

दोडामार्ग सावताचावाडा येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली कधीही ही इमारत कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो वारवार संबंधित विभागाला कळविले होते मात्र याकडे दुर्लक्ष केला गेल्याने येथील पालकांनी आपल्या मुलांना त्या अंगणवाडीतील नावे कमी करून आपल्या मुलांना दुसऱ्या अंगणवाडीत नावे दाखल केल्याचे आज उघडकीस आले.