सावंतवाडीत जितेंद्र आव्हाडांचं जोरदार स्वागत...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 17:02 PM
views 175  views

सावंतवाडी : शहरात विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादीचे फायरब्रॅण्ड नेते जितेंद्र आव्हाड यांचं जंगी स्वागत करण्यात आले. ‌सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री प्रविण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जावेद शेख, हिदायतुल्ला खान, राकेश नेवगी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांच जंगी स्वागत केल.

यावेळी ते बोलताना म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार होऊन आठवडा झाला तरी मंत्रीपदे दिली जात नाही. बिनखात्याचे ९ मंत्री सरकारमध्ये आहेत. यावरूनच राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी. तर सावंतवाडीत येऊन स्थानिक आमदार शालेय शिक्षणमंत्री मंत्री दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी टिकास्त्र सोडले. पवारांना कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे विभूती फू-फू करण्या एवढं सोपं नाही असा खोचक टोला हाणला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.