कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालकांचा अर्चना घारे यांच्याकडून तीव्र निषेध

Edited by: विनायक गावस
Published on: November 17, 2023 18:58 PM
views 212  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे युवा कार्यकर्ते मिहिर मठकर, भूषण बांदीवडेकर आणि त्यांचे सहकारी यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी संजय गुप्ता यांनी उडावा उडवीची उत्तरे देत त्यांचा अवमान केला.

एवढ्यावरच न थांबता संजय गुप्ता यांनी रेल्वेशी संबंधित मागण्यांसाठी लढणारे स्व. डि. के. सावंत यांच्याबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केले. "तमाम सावंतवाडीतकरांचा हा अपमान असून याचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते अशी संतप्त भावना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे - परब यांनी व्यक्त केली. कोकण रेल्वे प्रशासनाची ही घमेंड उतरवण्यासाठी २६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या आंदोलनास मी सक्रिय पाठिंबा जाहीर करते असेही अर्चना घारे - परब यांनी जाहीर केले.