अजित पवार गट - राष्ट्र्वादी कडून नारायण राणेंचा जोरदार प्रचार..!

Edited by:
Published on: May 02, 2024 08:24 AM
views 144  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले आणि पदाधिकारी सावंतवाडी तालुक्यातील दुर्गम गावात जाऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत. यामध्ये असनिये, ओटवणे, वेर्ले, अंबोली, कुंभवडे, चौकूळ, मडुरा, कास, बांदा, सांगेली या भागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करत आहेत.  राज्य सरकारमध्ये अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केले. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेतकरी आणि बागायतदारांची चर्चा करून नारायण राणे यांना मतदान करण्याच आवाहन केले.


प्रचारामध्ये तालुकाध्यक्ष उदय भोसले, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, असलम खतीब, सतीश नाईक, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, कलंबिस्त इथून विजय कदम, मडुरा येथील विलास पावसकर, ओटवणे गावातील कार्यकर्ते प्रभाकर गावकर, बाळकृष्ण नाईक, रूपाली मिस्त्री, असनिये येथून जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत तसेच कुंभवडे येथून सत्यप्रकाश गावडे आधी कार्यकर्ते व पदाधिकारी होते.