क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील : विशाल परब

आजगावातून एक तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू घडावा : विशाल परब
Edited by:
Published on: April 22, 2024 08:38 AM
views 302  views

सावंतवाडी : आजगाव:क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे.आजगावातून एक तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारा खेळाडू घडावा.यासाठी मी तुम्हाला वाटेल ते सहकार्य करायला तयार आहे. अशी भावना हाक युवा उद्योजक तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी घातली. 

वेताळेश्वर मित्रमंडळ आजगाव - भोमवार्डी आयोजित कै. वासुदेव साटेलकर, कै. रामा नारोजी आणि कै. यशवंत वेंगुर्लेकर, कै. वसंत (दादा) सातोस्कर यांच्या स्मरणार्थ भव्य एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विशाल परब बोलत होते. ही २२, २३, २४, एप्रिल कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. तर आज या स्पर्धेचा शुभारंभ करत विशाल परब यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

कोकणातील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी वी इध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. यांसारख्या अनेक क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत आणि आपल्या कोकणचा नावलौकिक व्हावा, हीच सदिच्छा यावेळी व्यक्त केली. प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ, क्रिकेटपटू, प्रेक्षक आदी उपस्थित होते.