मंत्री केसरकरांच्या घरासमोर कडक बंदोबस्त..!

Edited by:
Published on: September 05, 2023 10:50 AM
views 614  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची,विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांची प्रचंड कुचंबणा होत असल्याचं सांगत, त्याकडे नामदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकदिनी आज ५ सप्टेंबरला युवासेनेच्या वतीने मंत्री दिपक केसरकर यांच्या घरासमोर युवासेना बोंबाबोंब आंदोलन थोड्याच वेळात करणार आहे.

आंदोलनच्या या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुमारे 30 ते 40 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून महिला पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागून राहिले आहे. युवासेना कशा पद्धतीने आंदोलन करतो हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.