राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी

हिंदू जनजागरण समितीने पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 07, 2025 08:31 AM
views 174  views

सिंधुदुर्गनगरी : स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला आणि प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यावर तिरंगा कुठेही टाकेकेले दिसतात हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून तो रोखण्याविषयी कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागरण समितीने पोलीस अधीक्षक ,अप्पर जिल्हाधिकारी,  शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

 हिंदू जनजागरण समितीच्यावतीने आज अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे,पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी डावीकडून श्रीकृष्ण शिरोडकर, रमेश राणे, जयदीप सावंत, अशोक हरमलकर, सुभाष चव्हाण, रवींद्र परब व पुरुषोत्तम हरमलकर उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जिल्हास्तरावर राष्ट्रध्वज संरक्षण समिती स्थापन करावी,प्लस्टिक ध्वजावार बंदी घालावी जर विक्री करत असणाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत ,राष्ट्रधवजाचा सन्मान राखा हा शाळामध्ये उपक्रम राबविण्यात यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत