न्हावेलीत स्ट्रीटलाईट पंधरा दिवस बंदावस्थेत ; ग्रामस्थांत नाराजी

Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 11:54 AM
views 90  views

सावंतवाडी : न्हावेली-भटाचेटेंब,चौकेकरवाडी, टेंबवाडी,नागझरवाडी,भोमवाडी,येथील स्ट्रीटलाईट गेले पंधरा दिवस बंदावस्थेत असून याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत यांना सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असून आम्ही नेमकी कोणाकडे दाद मागावी असा सवाल ग्रामस्थ यांनी केला आहे. 

रस्त्यावर काळोख असल्याने दोन दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता. तसेच ग्रामस्थांना रात्री अपरात्री घराबाहेर पडताना अंधारामुळे चाचपडत वाट शोधावी लागते.याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनास दिली असता त्यामुळे येथील जनतेला उजेडात कोण आणणार असा सवाल न्हावेली ग्रामस्थांनी केला आहे. तसेच लवकरात लवकर स्ट्रीटलाईट सुरू करण्याची मागणी केली आहे.