
रत्नागिरी : हातखंबा येथून एक अपघाताची बातमी समोर येत आहे. जयगड येथून कोल्हापूर दरम्यान जाणाऱ्या ट्रकने दोन कार व चार मोटरसायकलला धडक देऊन अपघात केल्याची घटना समोर येत आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.
त्यात रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी झरेवाडी येथे आपल्या घरी जात असताना या अपघातात ठार झाल्याचे वृत्त आहे. नाणीज येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेने या अपघातातील जखमींना तत्काळ सर्वसाधारण रुग्णालय रत्नागिरी येथे नेले आहे. तेथे अधिक उपचार सुरु झाले आहेत.