श्रीराम वाचन मंदिर इथं २४ डिसेंबरला कथाकथन स्पर्धा

Edited by:
Published on: December 08, 2024 19:17 PM
views 252  views

सावंतवाडी : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने मंगळवार २४ डिसेंबर रोजी सानेगुरुजी जयंती निमीत्त सकाळी १०.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर येथे द. कृ. वाडकर कृतज्ञता निधी सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी दिवंगत नेते कै. दत्तारम वाडकर यांनी संस्थेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या ठेव रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी पू. सानेगुरुजी जयंती निमीत्त शालेय विद्याथ्यांसाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे २९ वे वर्ष आहे. ही स्पर्धा  ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद शाळांनाही या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. या स्पर्धेत गट पहिला : इयत्ता ५ वी ते ७ वी-प्रथम क्रमांक- रु. २५०/, द्वितीय क्रमांक- रु. २००/-, तृतीय क्रमांक- रु. १५०/- गट दुसरा : इयत्ता ८ वी ते १० वी-प्रथम क्रमांक रू. ३००/-, द्वितीय क्रमांक रु. २५०/-, तृतीय क्रमांक- रु. २००/- अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी कोणत्याही संस्कारक्षम कथेची निवड करावी. स्पर्धकाला ५ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धा आटोपल्यावर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होईल. प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटातून दोनच स्पर्धक विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. स्पर्धकांची नावे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर पर्यंत स्विकारली जातील. स्पर्धक विद्यार्थी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.