एडगाव येथे वादळाचा तडाखा | सुमित्रा मंगल कार्यालयाच्या छप्पराचे नुकसान

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 26, 2023 18:51 PM
views 179  views

वैभववाडी : तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.याच सोबत मंगळवारी रात्री वादळ झाले.या वादळात एडगाव येथील जयश्री रावराणे यांच्या सुमित्रा मंगल कार्यालयाच्या छप्पराचे नुकसान झाले आहे. सभागृहाचे छप्पर उडाल्याने  पावसाचे पाणी संपुर्ण सभागृहात साचले होते.