ते काम तात्काळ थांबवा; मंगेश लोके यांची मागणी

Edited by:
Published on: May 16, 2023 07:51 AM
views 92  views

वैभववाडी: येथील शासकीय गोदामानजिक शासकीय जमीनीत सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी तहसिलदारांकडे केले आहे.

       वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील सर्व्हे क्रमांक३६अ १ ही जमीन शासकीय आहे.शासकीय गोदामानजीक ही जागा असुन या जागेत सध्या पक्के बांधकाम सुरू आहे.यासंदर्भात आम्ही प्राथमीक माहीती घेतली असता या बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतलेली नाही.असे असताना बांधकाम केले जात आहे.तरी सुरू असलेले बांधकाम नेमकी कोणती संस्था किवा व्यक्ती करीत आहे.त्यांना परवानगी कुणी दिली किवा नाही याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे.याशिवाय सुरू असलेले बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे.हे बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तहसिल कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख श्री.लोके यांनी दिला आहे.यासंदर्भातील निवेदन तहसिलदार श्रीमती देसाई यांच्याकडे देण्यात आलेले आहे