फटाके लावून हत्ती हाकलणं थांबवा, वनविभागाला सहकार्य करा

अंकुश नाईक यांचं आवाहन
Edited by: लवू परब
Published on: September 17, 2025 17:00 PM
views 89  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातून बांदा पंचक्रोशी व गोवा राज्याच्या सीमा भागात गेलेला ओंकार हंत्ती शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या फटाके लावण्यावरून सैर-भैर झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके नलावता तो हंत्ती आलेल्या ठिकाणी परत जाण्यास वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन गोवा पेडणे तालुक्यातील वनक्षेत्रपाल हरीश महाले यांनी केले आहे. या संदर्भात दोडामार्ग भाजपचे युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश ( भैया ) नाईक यांच्याशी त्यांनी चर्चा केली व 

सिंधुदुर्ग च्या वनवीभागाने लोकांना आवाहन करावे की हंत्ती ज्या ठिकाणी आहे त्या भागातील नागरिकांनी फटाके लावून त्याला भयभीत करू नये व तो आपल्या मूळ जागेवर जाण्यास सर्वांनी सहकार्य करावें अशी चर्चा यावेळी झाल्याचे नाईक यांनी सांगितले.

अंकुश नाईक कोकणसाद लाईव्ह शी बोलताना म्हणाले की आपल्याला गोव्यातील पेडणे तालुक्याचे वनक्षेत्रपाल हरीश महाले यांनी फोन द्वारे संपर्क केला व आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. व दोडामार्ग तालुक्यातून ओंकार नामक हंत्ती गेला आठवडा भर नेतर्डे, गाळेल, डोंगरपाल, तसेच पेडणे तालुक्यातील मोपा, तोरसे, पत्रादेवी, खडशी आदी गावांत येत आहे याच कारण म्हणजे गाळेल, नेतर्डे, आदी भागातील शेतकरी, नागरिक हंत्ती आला की फटाके, लावतात व त्याला हाकलतात फटाके लावले की तो हंत्ती सैरभैर होतो आणि मिळेल त्या मार्गाने पुढे म्हणजे गोव्यात येतो त्यामुळे या शेतकऱ्यांना तुम्ही व सिंधुदुर्ग वनविभागा नार्फत आवाहन करा की हंत्ती आल्यावर फटाके लावून त्याला भयभीत करू नको. हंत्ती बुद्धिमान प्राणी आहे. तो ज्या वाटेन इकडे आला तो परत त्याच वाटेने तो आपल्या मूळ ठिकाणी जाणार त्यामुळे फटाके, बॉम लावणे यासारखे प्रकार करून तो हंत्ती गोव्यात पाठवू नको कारण गोव्याच्या सीमेवर नदी, समुद्र भाग आहे त्यामुळे तो आलेला हंत्ती नदी पार करून पुढे जाऊ शकत नाही तो आपल्या मूळ जागेवर परत जाणार त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे त्यांनी आवाहन केले. 

तसेच सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याशी नाईक यांनी फोनद्वारे संपर्क केला व सर्व विषय सांगितला त्यावेळी पाटील बोलेले की आम्ही आमच्या विभागा मार्फत आवाहन करतोच तुम्ही नागरिक म्हणून सर्वांना आवाहन करा की हत्तीला फटाके लावून हाकलण्याचा प्रयत्न करू नको कारण तो फटाक्यांच्या आवाजाने व नागरिकांच्या आरडा ओरड यामुळे सैरभैर झाला आहे. तो कधीही जीवित हानी करू शकतो त्यामुळे  असे प्रकार थांबवा असे आवाहन ही अंकुश नाईक यांनी केले आहे.