
सावंतवाडी : कोल्हापूर येथे गुरुश्री अकादमी तर्फे झालेल्या राज्यस्तरीय अॅबॅकस स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. गुरुश्री अकादमी तर्फे झालेल्या अबॅकस स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मधील एकूण १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच, बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यापैकी प्रशालेतील इयत्ता ६ वी मधील हेरंब नाटेकर व इयत्ता ५ वी मधील माझ पटेल यांनी प्रथम श्रेणी पटकावली. तर, इयत्ता २ री मधील नैतिक जाधव, इयत्ता ३ री मधील पवित्र शिंदे व इयत्ता ६ वी मधील विहान राणे या विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी पटकावली. इयत्ता १ ली मधील अर्जुन भिसे, इयत्ता ५ वी मधील प्रत्युषा घोगळे, रेहान सारंग, निशात पठाण, अद्वैत पाथरवट व इयत्ता ६ वी मधील शार्दुल धारगळकर यांनी अनुक्रमे चौथी श्रेणी प्राप्त केली. इयत्ता ६ वी मधील वैष्णव सावंत व हिना सारंग यांनी पाचवी श्रेणी पटकावली. तसेच, इयत्ता १ ली मधील मिहिरा खटावकर, नित्या धुरी, इयत्ता २ री मधील तनिश भिसे, इयत्ता ३ री मधील अंश मासंग, इयत्ता ५ वी मधील किमया पोटे व इयत्ता ६ वी मधील विजय सावळ यांना उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त केली.
स्पर्धेत सहभागी वरील सर्व विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह म्हणजेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गुरुश्री अॅबॅकस अकादमीच्या शिक्षिका कनिका, सौ. सुदिक्षा व श्री. भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. वरील परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अँड. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी भरभरून कौतुक केले. तसेच, विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.