स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचं गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश

Edited by: विनायक गावस
Published on: September 13, 2023 14:49 PM
views 84  views

सावंतवाडी : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळा तर्फे 'गणित संबोध परीक्षा' घेण्यात आली. यामध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यामध्ये कु. अस्मी धीरज सावंत हिने ९६ गुण प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर सायना श्रीराम अळवणी(८८), भार्गवी विशाल परब(७६),  तुषार कोरगावकर(८०), वैदेही मनीष शिरोडकर(८८), सोहम सचिन देशमुख (८८), श्लोक विराज मडकईकर,  मोझेस विजयजॉर्ज महाडे(९०), तनिष्क राजेश पवार(७८), हर्ष समीर साटेलकर (८२), अगस्त्य दिपक तानपुरे(७८) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली. तसेच, तन्मयी वैभव परब (७४),  स्पृहा अमेय आरोंदेकर (७०), हिना जसिम सारंग(६२), हेरंभ श्यामसुंदर नाटेकर(६६), तनिष्क अमर निर्मले(७०), इशान सचिन राऊळ (६२), रिचर्ड बेन्टो रोडरिग्स(६२), वैष्णव उदय सावंत(६८) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, कु. रोनक राकेश पवार(३८), या सर्वच विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत यश घवघवीत यश संपादन केले.

प्रथम श्रेणी व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळा तर्फे परीक्षेच्या पुढील स्तराकरिता म्हणजेच गणित प्राविण्य परीक्षेसाठी निवडले गेले. वरील पहिल्या स्तरात घेतल्या गेलेल्या गणित संबोध परीक्षेसाठी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील गणित विषयाचे अध्यापन करणाऱ्या सहा. शिक्षिका  प्राची साळगावकर यांचे सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे संचालक जुल पाटणकर  व मुख्याध्यापिका दिशा कामत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस प्रोत्साहन दिले.