
कणकवली : कणकवली तालुक्यातील पहिल्या चौथ्या फेरीतील ४० गावांचा ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला आहे. त्या ४० गावांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता २६ ग्रामपंचायतीवर तर शिवसेना १० ग्रामपंचायत आणि गाव विकास पॅनल ४ ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे.
चौथी फेरी
हळवळ सरपंच अपर्णा जाधव (भाजप), शेर्पे समिता पांचाळ(भाजप), दिगवळे संतोष गावकर (शिवसेना), घोंनसरी मक्सी पिंटो (भाजप), नडगिवे – (गाव पॅनेल),माईन नितिशा पाडावे (भाजपा), कुंभवडे विजया कानडे (शिवसेना), ओसरगाव सुप्रिया कदम (भाजपा) आदी तिसरी फेरी जाहीर झाली आहे.
तिसऱ्या फेरीत लोरे नंबर १, कोंडये ,नरडवे, नागवे,जाणवली,करंजे,हरकुळ खुर्द या सात गावांमध्ये विजयी सरपंच तर शिवसेना ठाकरे गट असलदे, शिरवल हे दोन गाव तर गाव पॅनल साळीस्ते अपक्ष सरपंच निवडून आले आहेत.
दुसऱ्या फेरीत भाजपाचे सरपंच सावडाव, तरंदळे, आशिये, कासरल, बोर्डवे, तिवरे,बिडवाडी,दारीस्ते,डामरे, पियाळी, वरवडे, कुरंगवणे, तर शिवसेना ठाकरे गट कोळोशी, आयनल, सातरल, वाघेरी, कसवण, तळवडे, शिवडाव आणि गाव पॅनेल चिंचवली, दारुम आदी गावांमध्ये पक्षीय सत्ता प्रस्थापित झाली आहे.