डोंबारी समाजाच्या प्रश्नांबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 06, 2023 19:10 PM
views 55  views

सावंतवाडी : शहरातील डोंबारी समाज हा बऱ्याच वर्षापासून सावंतवाडीत स्थलांतरित आहे. परंतु सध्यस्थितीत या समाजातील काही व्यक्ती मृत पावल्यास ती दहन करण्यासाठी जागे संदर्भात मोठा प्रश्न उद्भवत आहे. स्मशानभूमीमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्मशानभूमी जागा निश्चिती संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी लवकर तोडगा काढू व त्या स्मशानभूमीच्या जागेत विविध सोयी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. यावेळी अखिल महाराष्ट्र डोंबरी समाज संघटनेचे अध्यक्ष मयूर लाखे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, कार्याध्यक्ष सुरेश सोनटक्के, उपाध्यक्ष भारत लाखे, सचिव नरेश खोरागडे, शिवाजी पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.