देवगड तालुक्यातील विकास कामांसंदर्भात मंत्री नीतेश राणेंना निवेदन

Edited by:
Published on: January 19, 2025 11:40 AM
views 328  views

देवगड : देवगड मधील विविध विकास कामांन बाबत महाराष्ट्र राज्य मस्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांना देवगड तालुक्यातील विविध विकास मंडळांकडून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात विविध मागण्या संदर्भातील विकासात्मक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रवासी वाहतूक बोट चालू करणे,पोकळे दुकान ते खराडा हा रस्ता रेकॉर्ड ऑफ राईटला लागलेला आहे तरी तो ताबडतोब दुरुस्त करणे.यामुळे शहरात ट्रॅफिकचे नियोजन करता येईल,किल्ले देवगड येथे बॉटनिकल गार्डनची निर्मिती केल्यास पर्यटकांसाठी एक आकर्षण होईल व पर्यटक वाढतील,देवगड आनंदवाडी जेटी रखडलेला प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास आला तर मासेमारी बांधवांचा प्रश्न कायमचा सुटेल व बोटी किनाऱ्याला लावण्यासाठी सुरक्षितता मिळेल देवगड निपाणी राष्ट्रीय महामार्गाचे देवगड बाजारपेठेमध्ये रुंदीकरण करणे ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही,देवगड मध्ये स्मार्ट सिटी तत्त्वावर मच्छी मार्केटची उभारणी करणे, जेणेकरून मासे विक्री करणाऱ्या भगिनींना व मासे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सोयीचे होईल,देवगड पाणीपुरवठा नळ योजनेचे नूतनीकरण करणे जेणेकरून देवगडवासियांचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल,. देवगड येथे अत्याधुनिक व सुसज्य असे हवामान केंद्राची उभारणी करणे जेणेकरून मासेमारी करणारे व अंबा बागायतदार यांना याचा मोठा फायदा होईल,देवगड येथील मुख्य नाका मांजरेकर नाका येथील सर्कलची लवकरात लवकर निर्मिती करणे जेणेकरून ट्रैफिक कंट्रोल होईल व होणारे अपघातही नियंत्रित होतील, तसेच पर्यटकांनाही मार्गदर्शन मिळेल आणि शहराला एक नाविन्य प्राप्त होईल, देवगड येथील ग्रामीण स्णालयामध्ये अत्याधुनिक साधनसामग्री व डॉक्टर्स आणि नर्स यांचे कायमस्वरूपी नियुक्ती करणे, तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयाचे जे पूर्वीचे गेट आहे ते तसेच वाहतुकीसाठी चालू ठेवणे कारण बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी तिथे एसटीचा स्टॉप आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते सोयीचे आहे,देवगड बंदर येथील साठलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न करणे जेणेकरून बोटी किनाऱ्यावर लावण्यासाटी सोयीचे होईल,देवगड शहरामध्ये भुयारी विद्युत लाईन करण्याचा प्रयत्न करणे,हापूस आंबा वाईन उद्योग उभारणी करण्यासाठी प्रयत्न  करणे,मासळी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे,देवगड येथे एका कलादालनांची उभारणी करणे जेणेकरून तालुक्यातील साहित्यिक माहिती,जुन्या प्राचीन वस्तू यांचे जतन होईल,देवगड किल्ला दुरुस्ती रंग काम व सुशोभीकरण करने, एमपीएससी,यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षा (अनुदानित तत्वावर सुरू करावेत जेणेकरून तालुक्यातील तालुक्याबहेरील मुलांना सोईचे होईल तसेच अद्ययावत क्रीडासंकुल व्हावे शंभर वर्ष पूर्ण झालेल्या प्राथमिक मराठी शाळांसाठी विशेष अनुदानाची सोय करावी मासेमारी बांधवानातीसाठी प्रशिक्षण प्रक्रिया कायम निवारा सोय करणे जेणेकरून येशील युवक त्या धंद्याकडे आकर्षित होती त्याना रोजगार व धंदा  उपलब्ध होईल.अष्या विविध मागणी संदर्भातील निवेदन यावेळी.देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ, हनुमान युवक मित्रमंडळ,आंबा व इतर बागायती संघ,देवगड तालुका पेन्शन असो.,देवगड भंडारी समाज, देवगड रिक्षा चालक मालक संघटना,देवगड आंबाउत्पादक,अंतरराष्ट्रीय मानवाधिकार या सर्वांच्या वतीने देण्यात आले आहे.

यावेळी निशिकांत साटम, देवगड शहर विकास ग्रामीण मंडळ अध्यक्ष शामल जोशी महिला अध्यक्ष, सुधीर मांजरेकर खजिनदार, विलास रूमडे  बलवान सर सोनटक्के सर आप्पा अनुभवणे आदी उपस्थित होते.