
कुडाळ : मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण कामाच्या नियोजन शिक्षक प्रगणकांच्या गैरसोयी दूर करण्यात याव्यात अशी मागणी कुडाळ तालुका शिक्षक भारती संघटनेच्यावतीने तहसीलदार अमोल फाटक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी मंगळवारी कुडाळ तालुक्यात सुरुवात करण्यात आली. मात्र यामध्येही आता तांत्रिक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. याबाबत शिक्षक भारती संघटनेने लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल फाटक यांचे लक्ष वेधले आहे. हे निवेदन शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष विनेश जाधव, उपाध्यक्ष चेतन मागाडे, विभागीय अध्यक्ष गणेश पाताडे, स्पर्धा प्रमुख विनायक जंगले यानी दिले.
शिक्षक भारतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी कामाची नियुक्ती देताना काही शिक्षकांना शाळेच्या मुख्यालयाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी १० ते १२ कि.मी. अंतराच्य ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. कामाची व्याप्ती व कालमर्यादा लक्षात घेत्ता पूर्ण वेळ शाळा चालविण्याची सक्ती करण्यात येवू नये. किंबहुना सेवा अधिग्रहितअसल्याने शाळेच्या वेळेतच सर्व्हेक्षण करण्याची मुभा द्यावी .तसा लेखी आदेश शिक्षण पर्यवेक्षित यंत्रणेस आपल्या स्तरावरून देण्यात यावा. तथापि सर्वेक्षणाच्या कामात अडथळे आणणारे मुख्याध्यापक, पर्यवे क्षित यंत्रणा याबाबत संघटनेकडे तक्रारी आल्यास संबधित यंत्रणेच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल. या कालावधीत कोणतेही प्रशिक्षण आयोजित करु नये. या कालावधीत शालेय व्यवस्थापनाच्या पालकांकडून तक्रारी निर्माण झाल्यास आपल्या स्तरावरून निवारन करण्यात यावे.तरी वरील बाबींचा विचार करता प्रगनक म्हणून नियुक्त असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक व पर्यवेक्षित यंत्रणा यांना लेखी आदेश देण्यात यावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी 381 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कुडाळ तालुक्यात मंगळवारी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सुरुवात करण्यात आली. यासाठी शिक्षक, ग्रामसेवक तलाठी, आशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वेक्षणासाठी तहसीलदार अमोल फाटक यानी 381 कर्मचाऱ्यांना प्रगनक म्हणून नियुक्त केले आहे.
दोन शिक्षकी शाळा बंद राहण्याची शक्यता : शिक्षक भरती कुडाळ तालुकाध्यक्ष दिनेश जाधव
कुडाळ तालुक्यात मराठा समाज सर्वेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असली तरी दूध शिक्षकी शाळा असलेल्या शाळेतील दोनही शिक्षकांना या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आली आहे यामुळे दोन शिक्षकी शाळा या सर्वेक्षण आदरम्यान बंद राहण्याची शक्यता न करता येत नाही असे शिक्षक भारती संघटनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष विनय जाधव यांनी सांगितले.