देवगड पेन्शनर्स असोसिएशनकडून गटविकास अधिकारी यांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 23, 2023 11:59 AM
views 107  views

देवगड : पेन्शनर्स असोसिएशन देवगड, कडून गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड, यांना 7 वा वेतन आयोगातील थकित फरकाचा 3 रा व 4 था हप्ता मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की,महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्ण 24 मे 2023 नुसार सेवानिवृत्ती धारकांचा 7 वा वेतन आयोगातील फरक 4 था हप्ता रक्कम माहे जून 2023 च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावीत. शासन निर्देश असूनही आजपर्यंत सदर 4 था व मागील 3 रा फरक रक्कम खात्यामध्ये अदा झालेली नाही. केवळ आश्वासने देण्यात येत आहेत. हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व इत्तर निवृत्ती कर्मचा-यांचा अपमान आहे. तरी 7 वा वेतन आयोगातील फरक हप्ता 3 रा व 4 था रक्कम लगेचच जमा करण्यात यावी.

शिवाय दर महिन्याच्या 1 तारखेला मागील महिन्यांचे पेन्शन जमा करण्यात यावे. 80 वर्षावरील सर्व निवृत्तीधारकांना मुळनिवृत्तीवेतनातील वाढीचा फायदा आपोआप कार्यालयाकडून देण्यात यावा. तसेच याविषयक आपण सकारात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी असे या म्हणण्यात आलेआहे.