
सावंतवाडी : माझ्या पाठिशी सर्वजण आहेत. त्यामुळे आम्हाला जिंकण्यासाठी लढायच आहे असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील मेळाव्यात ते बोलत होते
ते म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी कोट्यवधींचा निधी दिलाय, काम केलीत. याचा फायदा पक्षाला होत आहे. मंत्री उदय सामंत यांनी देखील असच लक्ष आमच्यावर ठेवावं असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, माजी मंत्री आम. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.










