
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून आज सायंकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे मालवणात येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण भाजपा कार्यालयाला भेट देत उमेदवार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर आज हे दोन्ही नेते सायंकाळी 5 : 30 वाजता भाजपा कार्यालयात येणार आहेत.
लढणाऱ्या भाजपला आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे कोणता कानमंत्र देतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आज भाजपाने प्रचाराचा देखील शुभारंभ केला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. मालवणात देखील मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे.













