
सावर्डे : गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथे असोसिएशन ऑफ फार्मसी टिचर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्तरीय परीसंवाद एक्सप्लोरिंग अनसीन फील्ड्स इन फार्मासूटिकल इंडस्ट्री-“ न्यूट्रासूटीकल, व्हेटरीनरी आणि मेडीकल डीवायसेस” या विषयावर आयोजित केला गेला. या कार्यक्रमांमध्ये न्यूट्रासूटीकल, व्हेटरीनरी आणि मेडीकल डीवायसेस या विषयांवरील मार्गदर्शनाकरीता श्री. हेरंब रहाळकर सिन्स्पो भार्त या कंपनीचे संस्थापक, डॉ. मंगेश घाडीगांवकर एम.डी.व्हेटरीना फार्मासूटिकल ,पुणे श्री. यश भट मेरील लाइफ सायन्सेस,वापी गुजरात यांना आमंत्रित केले गेले. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना या वरील क्षेत्रात रोजगाराच्या संधीची माहिती उपलब्ध करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय होते.
तसेच या दिवशी वरील विषयांवरील मॉंडेल स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कोकणातील विविध महाविदयालयांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेत गोविंदराव निकम फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘लेसर डीफ्र्र्याक्शन’ मशीन बनवून प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच कोकणातील इतर महाविद्यालयानी उस्फुर्त सहभाग नोंदविला व बक्षिसे पटकाविली.
या कार्यक्रमास आमदार शेखर निकम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नवनविन संधीच्या महितीचा फायदा घ्यावा व उत्तुंग यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पूजा निकम या कार्यक्रमास उपस्थित होत्या..
या परीसंवादाचे आयोजन कॉलेजचे उपप्राचार्य प्रविण वाघचौरे यांच्यासोबत डॉ.ललिता नेमाडे, अनुराधा गावडे, प्रतिक्षा निकम, हलिमा मालगुंडकर, मृणाल करंजकर यांनी कले.