
सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
त्यानुषंगाने अन्नधान्य,भात, नाचणी (रागी) पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरुन कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या
www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.
पिकस्पर्धेतील पीके: खरीप पीके:- भात, नाचणी (रागी),
अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख: खरीप हंगाम: भात, नाचणी (रागी), 31 ऑगस्ट 2025
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा, व राज्य पातळीवरील प्रथम,
व्दितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे, तालुका पातळी- पहिले- 5 हजार, दुसरे- 3 हजार व
तिसरे 2 हजार, जिल्हा पातळी- पहिले- 10 हजार, दुसरे- 7 हजार व तिसरे 5 हजार, राज्य पातळी - पहिले- 50
हजार, दुसरे- 40 हजार व तिसरे 30 हजार.