राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनचे पारितोषिक वितरण !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 15, 2024 14:40 PM
views 61  views

सावंतवाडी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24 चे पारितोषिक वितरण बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर अॉनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी बालवैज्ञानिकांना विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


पारितोषिक वितरणाचे वाचन  राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे ज्येष्ठ अधिव्याख्याता राजकुमार अवसरे यांनी केले . प्राथमिक विद्यार्थी गटात शि. प्र. म. माध्यमिक कन्या शाळा घाटंजी, जि. यवतमाळ च्या कार्तिकी किरण डेहणकर हिच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक व चॅम्पियनशिप प्रदान करण्यात आली. माध्यमिक विद्यार्थी गटात महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय, वेल्हाळे जिल्हा जळगाव च्या अनिकेत रमेश सुरवाडे याला प्रथम क्रमांक मिळाला. दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, जि. नागपूरचा वंश विलास मरस्कोल्हे याला तर माध्यमिक गटात एस. एम. चोकशी हायस्कूल पुणेचा रुशील मिलिंद पाटडीया याला प्रथम क्रमांक मिळाला. आदिवासी विद्यार्थी प्राथमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार जि .नागपूरची आसावरी अशोक असावाले माध्यमिक गटात अनु. माध्यमिक आश्रमशाळा आष्टी जि . यवतमाळचा कार्तिक दिगांबर पेदेवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षक प्रतिकृती प्राथमिक गटात शहिद मिश्रा विद्यालय, तिरोडा, जि . गोंदिया चे एल. वाय. चौरावार व माध्यमिक गटात गांधी विद्यालय, आर्वी जिल्हा वर्धाचे रौशन रऊफ शेख यांना प्रथम क्रमांक मिळाला.

प्रयोगशाळा परिचर गटात सेंट जोसेफ स्कूल मुंबई (प.) चे भगत भास्कर अनंत यांचा प्रथम क्रमांक आला. सर्व विजेते, सहभागी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात आला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला ११,६५९ विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती घेतली. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. राधा अतकरी व प्रा. डॉ.राजकुमार अवसरे,कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे

शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी  श्रीम.कल्पना बोडके,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, यशवंतराव  भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रियांका देसाई, प्रसाद महाले, नितीन सांडये, सुजित कोरगावकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे, अवधूत मालणकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.