राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 11:40 AM
views 288  views

सावंतवाडी : माजी पंचायत समिती सदस्य तथ भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संदिप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत महाराष्ट्र आणि गोव्यातील खेळाडुंसाठी राज्यस्तरीय मान्सुन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेत्या संघाला 25 हजाराचे बक्षीस देण्यात येेणार आहे. याबाबतची माहीती संदिप गावडे मित्रमंडळाचे अनिकेत आसोलकर यांनी दिली आहे .

ही स्पर्धा 15 ऑगस्टला जिखमाना मैदानावर खेळवली जाणार आहे. यात उत्कृष्ठ खेळाडूू, उत्कृष्ठ कीपर,उत्कृष्ठ डीफेन्स व उत्कृष्ठ गोल अशी प्रत्येकी पाच हजाराची पारितोषिक देण्यात येणार आहे. 

संदीप गावडे यांचा वाढदिवस नुकताच सामाजिक कार्यक्रमानी साजरा झाला. या औचित्याने महाराष्ट्रासह गोव्यातील खेळाडूंना व्यासपिठ मिळावे म्हणून मित्रमंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रासह गोव्यातील खेळाडुंच्या अंगात असलेल्या क्रिडाप्रकारांना वाव मिळण्यासाठी क्रिकेटच्या पलिकडे जावून मंडळाकडून काही वेगळे करण्याचा निर्णय घेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा एक दिवसीय असेल, संघ वाढल्यास किंवा काही अडचण आल्यास दोन दिवस ही स्पर्धा खेळविली जाईल. प्रथम संपर्क करणार्‍या 25 संघाना या स्पर्धेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. तर यासाठी नियमीत खेळाचे नियम ठरविण्यात आले आहेत. ज्या स्पर्धकांना या टिमना या खेळात सहभागी व्हायचं आहे त्यांनी 9422908853, 9421437033 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन  यावेळी अनिकेत आसोलकर यांनी केले. यावेळी मंडळाचे चैतन्य सावंत,हेमंत पांगम अभिषेक लाखे,कीसन धोत्रे,शुभम कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.