निलेश मोरजकरांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार !

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 17:15 PM
views 66  views

सावंतवाडी : पत्रकार निलेश मोरजकर यांना 'ब्लू स्टार' सामाजिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर या संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर झाला असून त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते ७ जानेवारी २०२४ रोजी पंढरपूर येथे होणार आहे. पत्रकार मोरजकर यांना याच वर्षी राष्ट्रीय पातळीवरचा 'भास्कर भूषण अवॉर्ड' गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तर ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या तिहेरी पुरस्कार सन्मानाने त्यांचे बांदा शहरात अभिनंदन होत आहे.

मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग आहे. ते येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात शिवजयंतीचे औचित्य साधून विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. येथील नट वाचनालयचे ते उपाध्यक्ष आहेत. बांदा मराठा समाजाचे संस्थापक असून मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.