
सिंधुदुर्गनगरी : आज सिंधुदुर्ग कुडाळ उरूस येथील डी.पी.डी.सी हॉल मध्ये आयोजित जनता दरबार मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी कुडाळ वेंगुर्ला मठ ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्या संदर्भात जनता दरबार मध्ये तक्रार मांडण्यात आली. या तक्रारीची दखल घेत रस्त्या संदर्भात संपूर्ण कागदोपत्रांचा अभ्यास करून या रस्ताच काम तातडीनं सुरू करून अडचणी निर्माण करणाऱ्यांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नातू देखील उपस्थित होते.
संबंधित रस्ता हा कुडाळ नगरपंचायत हद्दीतील असून वेंगुर्ला मठ ते विजय कांबळी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची नोंद नगरपंचायत दरबारी २६ नंबर रस्त्याला लागून असल्याची आहे. सदर रस्त्यावरती विकास निधी खर्च करून देखील निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सत्तेचा गैर वापर करून कुडाळ नगर पंचायत मधील एका व्यक्तीने रस्त्याचे काम अडवले होते. परंतु सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री चव्हाण यांनी यावर लक्ष केंद्रित करून प्रकरणाचा सखोल अभ्यास करून संबंधित अधिकारी यांना तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच रस्त्याच्या कामा संदर्भात कोणीही अडचणी आणल्यास त्यावर शासकीय नियमानुसार कार्यवाही करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा असे आदेश प्रशासनाला दिले. यावेळी तक्रार दार तसेच नागरिकांनी पालकमंत्री यांचे आभार मानले.