LIVE UPDATES

अखेर सार्वजनिक बांधकामाला जाग ; गटार खुलं करण्यास सुरुवात

कोकणसाद LIVE ने वेधलं होत लक्ष
Edited by: लवू परब
Published on: June 05, 2025 13:44 PM
views 277  views

दोडामार्ग : कोकणसाद LIVE आणि दै कोकणसादच्या बातमीने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. दोडामार्ग बांदा मार्गावरील गटारंच गायब झाल्याने गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करून वाहने चालवावी लागत होती. आता गटारे खुली होत असल्याने वाहन चालकांचा त्रास दूर होणार आहे.  

मान्सून पूर्व सुरु असलेल्या पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणाला होता. दोडामार्ग बांदा तसेच विजघर, आयी या सर्व मार्गावरची गटारे बंद झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होत होते. त्यामुळे वाहन चालक व पादचारी यांना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत होती. दोडामार्ग बांदा मार्गावरील मणेरी पूल, कळणे, आडाळी एमआयडीसी कच्चा रस्ता ते माऊली मंदिर नजिक, मोरगाव, डेगवे थापेश्वर मंदिर निजक, पानवळ कॉजवे लगत या मुख्य ठिकाणी पावसाचे पाणी, चिखल रस्त्यावर साचून राहते. त्यामुळे रस्ता सुद्धा गायब होतो.

याबाबत कोकणसाद LIVEने बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधलं.  दोन दिवसात आडाळी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने गटार खुले करण्यास सुरवात केली. याच मार्गांवरील उर्वरित गटारे तात्काळ खुली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.