आंबेरी नवीन पुलावरून वाहतूक सुरू करा : योगेश धुरी

Edited by: भरत केसरकर
Published on: July 06, 2023 21:46 PM
views 186  views

कुडाळ : माणगाव खोऱ्याच्या दृष्टीने महत्वाचे आंबेरी पूल खासदार विनायक राऊत आणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आले आहे.पूल नवीन बांधून अजून त्याच्यावरून वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली नाही.जुने पूल हे धोकादायक झाले आहे. लवकरच नवीन पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

माणगाव कोणाला जोडणारे हे महत्त्वाचे पुल असून गेली अनेक वर्ष हे पुल व्हावे अशी मागणी होत होती. शिवसेनेच्या माध्यमातून या पुलाचा  पाठपुरावा केल्यानंतर हे पुल पूर्णत्वास गेले. त्यामुळे दरवर्षी जुन्या पुलावर पाणी येत असल्यामुळे माणगाव खोऱ्यातील 26 गावांचा संपर्क तुटत होता. आता या गोष्टीला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लवकरच लवकर पुल सुरू करावे असे मागणी योगेश धुरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे.